जागतिक संस्कृत दिन
जागतिक संस्कृत दिन दरवर्षी श्रावण पौर्णिमेला (रक्षाबंधनाच्या दिवशी) साजरा केला जातो. प्रथम याची सुरुवात १९६९ साली झाली. या दिवसाचे उद्दिष्ट संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देणे, तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे आणि जागतिक पातळीवर तिचा प्रचार करणे हे आहे.
संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य
-
ही जगातील सर्वात प्राचीन व संरचित भाषांपैकी एक आहे.
-
धार्मिक विधी, पूजाविधी, मंत्रोच्चार आणि शास्त्रांमध्ये याचा वापर प्राचीन काळापासून चालत आला आहे.
-
वेद, उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण यांसारखी अमूल्य ग्रंथसंपदा संस्कृतमध्ये आहे.
ऐतिहासिक पैलू
संस्कृत भाषेचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर परदेशातही दिसून येतो. युरोपीय विद्वान सर विल्यम जोन्स हे याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहेत.
१७८३ मध्ये ते ब्रिटिश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलकत्त्यात आले. तसेच एशियन सोसायटीचे संस्थापक होते. त्यांनी कालिदासांचे अभिज्ञान शकुंतलम् आणि ऋतुसंहार, तसेच जयदेवांचे गीता गोविंद यांचे इंग्रजी भाषांतर केले. तसेच मनुस्मृतीचेही इंग्रजीत भाषांतर केले.
महत्त्व:
जागतिक संस्कृत दिन आपल्याला या प्राचीन भाषेची श्रीमंती, तिची सांस्कृतिक मुळे आणि जागतिक वारसा जपण्याची प्रेरणा देतो.
0 comments:
Post a Comment