राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmer's Day) हा भारतात दरवर्षी 23 डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस शेतकऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी सन्मान देण्यासाठी समर्पित आहे.
शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे योगदान ओळखण्यासाठी शेतकरी दिन साजरा केला जातो. कृषी आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी दिन देखील साजरा केला जातो. याशिवाय हा दिवस कृषी नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती म्हणून शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरणसिंग यांनी देशातील शेतकरी समुदाय आणि शेतकऱ्यांच्या हक्क आणि कल्याणाचा पुरस्कार केला होता. चौधरी चरणसिंग हे शेतकरी नेते होते, म्हणून त्यांच्या जयंतीदिनी शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला
आज आपण सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने जात आहोत त्याला शेती हे महत्वाचे कारण आहे, शेती देशाला समृद्ध करण्यात मोठी भुमिका निभावते.
0 comments:
Post a Comment