महाराष्ट्र कृषी दिन 2025:
महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचे आणि महाराष्ट्राच्या कृषी विकासातील योगदानाचे गौरवकरण करण्यासाठी समर्पित आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्याची परंपरा आहे. त्यांनी 1963 ते 1975 या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषवताना महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले.
कृषी दिनाची पार्श्वभूमी:
वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय 1989 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर केला. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन आणि कृषी विद्यापीठांची स्थापना करून राज्याच्या कृषी विकासाला नवे वळण दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशातील अग्रगण्य कृषी उत्पादक राज्यांपैकी एक बनले.
कृषी दिनाचा अनोखा उपक्रम म्हणजे हा दिवस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची सुरुवात. एकनाथराव पवार यांनी या अभिनव उपक्रमाची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि आज गाव, तांडा, शहरे तसेच सरकारी कार्यालयांसह शेतकऱ्यांच्या बांधावरही कृषी दिन साजरा केला जातो.
0 comments:
Post a Comment