महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून दरवर्षी ६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. डॉ. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले, ज्याला बौद्ध धर्मातील महापरिनिर्वाण ही संकल्पना जोडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि भारतातील दलितांच्या हक्कांचे कट्टर समर्थक होते.
निधनाच्या काही आठवड्यांपूर्वी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, त्यांनी नागपुरात लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध अनुयायी त्यांना 'बोधिसत्त्व' मानतात.
'महापरिनिर्वाण' हा शब्द बौद्ध परंपरेतून प्रेरित आहे, जो निर्वाणानंतर अंतिम शांतीचे प्रतीक मानला जातो.
चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी देशभरातून जवळपास २५ लाख भीम अनुयायी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतात.
महापरिनिर्वाण दिन फक्त डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीचे स्मरण नाही, तर त्यांच्या संघर्षपूर्ण जीवन आणि सामाजिक न्याय, समता, व बंधुत्वाच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा दिवस आहे. भारतातील सामाजिक सुधारणा आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.
0 comments:
Post a Comment