नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस, जो महासप्तमी म्हणून ओळखला जातो, तो देवी कालरात्रीला समर्पित आहे. , देवी कालरात्रीला संकटांपासून बचाव करणारी मानले जाते. तिला ‘शुभंकरी’ म्हणूनही ओळखले जाते. देवी कालरात्रीचे नाव ‘काल’ (वेळ) आणि ‘रात्री’ (रात्र) यावरून आले आहे. तिला ‘काली माँ’ असेही म्हणतात.देवी कालरात्रीची पूजा रात्री केली जाते, आणि या रात्रीची पूजा शुभ मानली जाते. याच दिवशी देवी कालरात्रीने रक्तबीजाचा तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध केला होता.
देवी कालरात्रीला तिच्या कृष्ण वर्णामुळे (गडद रंगामुळे) हे नाव मिळाले आहे. तीन नेत्र असलेल्या देवी कालरात्री गाढवावर आरूढ असतात आणि त्यांच्या चार हातांत खड्ग (तलवार) आणि कांटा (लोखंडी शस्त्र) धारण केलेले असते.
जरी देवी कालरात्री अत्यंत भयंकर आणि उग्र रूपात असली तरी, ती आपल्या भक्तांना सर्व अडथळे आणि दु:ख दूर करून हवे ते आशीर्वाद देते. असे मानले जाते की देवी कालरात्री तिच्या भक्तांचे सर्व प्रकारच्या दानवांपासून रक्षण करते.
0 comments:
Post a Comment