नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजित देवी चंद्रघंटा आहे:
चंद्रघंटा माता देवी दुर्गाचा तिसरा अवतार आणि देवी पार्वतीचे विवाहित रूप आहे. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आकाराची घंटा असल्यामुळे तिचे नाव चंद्रघंटा आहे. तिला चंद्रखंड, वृकह्वहिनी किंवा चंद्रिका या नावांनीही ओळखले जाते.ती धैर्य आणि पराक्रम यांचे प्रतीक आहे. देवी चंद्रघण्टा जगात न्याय आणि शिस्त आणणारी आहे.
नवरात्रि उपासनेत तिसऱ्या दिवसाच्या पूजेचे अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी याच देवीच्या विग्रहाची पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रवेश करते. लोकवेदानुसार, माँ चंद्रघंटा यांच्या कृपेने अलौकिक वस्तूंचे दर्शन होते, दिव्य सुवासांचा अनुभव येतो आणि विविध प्रकारच्या दिव्य ध्वनी ऐकू येतात.
माँ चंद्रघंटा यांचे स्वरूप अत्यंत सौम्य, कल्याणकारी आणि शांततेने परिपूर्ण आहे. त्यांची आराधना केल्याने वीरता, निर्भयता यांच्यासोबत सौम्यता आणि नम्रतेचा विकास होतो.
0 comments:
Post a Comment