दिवस म्हणजे २९ जुलै हा संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून सेंट पिटरर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून ठरवण्यात आला.
भारतातील जंगलांचा एक अविभाज्य घटक म्हणजे वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून भारतातील प्रत्येक नागरिकाला तो आवडतो. प्रत्येकालाच वाघ जंगलात पाहण्याची इच्छा असते. मात्र, वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे आपण वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वाघांना आपल्या अधिवासासाठी जंगल हवे असते. जंगलांचे कत्तल करणे म्हणजे वाघांचे कत्तल करणे होय. त्यामुळे आपण जंगल वाचवले तरच वाघांना वाचवू शकतो. तसेच, वाघांच्या शिकार करणे यावर पूर्णपणे बंदी असावी. शिकार करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
वाघांचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून वाघांचे रक्षण केले तरच आपली येणारी पिढी देखील वाघांना पाहील.
0 comments:
Post a Comment