बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. दरवर्षी वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी साजरा केला जातो, या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या होत्या. मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित तत्त्वज्ञानामुळे, बुद्धांना जगातील सर्वात प्रभावशाली गुरु आणि एक आदर्श पुरुष मानले जाते.
बुद्ध जयंती ही केवळ भारतापुरतीच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ आणि इंडोनेशिया यांसारख्या सुमारे १८० देशांमध्ये राहणाऱ्या बौद्ध समुदायाद्वारे हा उत्सव आराधनेने साजरा केला जातो.
या शुभ दिवशी बौद्ध विहारांमध्ये विशेष प्रार्थना आणि ध्यानधारणा केली जाते. लोकांना शांतता, करुणा आणि अहिंसा यांचे महत्त्व आठवण करून दिले जाते. तसेच बुद्धांच्या शिकवणींचा पुनर्स्मरण केले जाते. काही ठिकाणी बुद्धांच्या मूर्तींची शोभायात्रा काढली जाते आणि दिवे लावून उत्सव साजरा केला जातो.
बुद्ध जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आत्मज्ञान आणि करुणेचा संदेश पसरवणारा दिवस आहे. या दिवशी आपण बुद्धांच्या शिकवणींचा सार समजून घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात करुणा, शांतता आणि अहिंसा यांचा अवलंब करण्याचा संकल्प करू शकतो.
0 comments:
Post a Comment